Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना जामीन मंजूर

Updated: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (09:23 IST)
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कोरोना काळातील कथित जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळाचे आरोप सुजित पाटकर यांच्यावर होते. अनेकदा छापेमारी आणि चौकशीनंतर ईडीकडून सुजित पाटकर यांना ऑगस्ट २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. आता तब्बल पाच महिन्यानंतर किल्ला कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.
 
कोर्टाकडून सुजित पाटकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १ लाख रुपयांच्या पर्सनल बाँडवर पाटकर यांचा जमीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच पाटकर यांना कोर्टाच्या परवानगीविना देश सोडण्यास मज्जाव केला असून त्यांचा पासपोर्ट कोर्टाकडे सुपूर्द करावा लागणार आहे.
 
काय आहे जम्बो कोविड सेंटर घोटाळा?
बनावट कागदपत्रांच्या आधारे दहिसर आणि वरळी येथील जंबो कोव्हिड सेंटरच कंत्राट मिळवल्याचा आहे सुजित पाटकर यांच्यावर लावण्यात आला होता. कोविड काळात सुजीत पाटकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर होते. या प्रकरणी ईडीकडून सुजित पाटकर यांची अनेकदा चौकशी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली होती. 

Edited By -Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

सिंगल चार्जमध्ये २४३ किमी धावणार! ७० लिटर स्टोरेजसह Simple Wave ई-स्कूटर लाँच

CSMT Sawantwadi Express सीएसएमटी ते सावंतवाडी दरम्यान नवी एक्सप्रेस सेवा सुरू

LIVE: शिवसेना पक्षाचा मालक कोण! पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी

महिला टी२० आशिया कपमध्ये भारतीय संघ हाँगकाँग चीनचा सामना करणार, किती वाजता सुरु होणार!

मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चा; नितीन गडकरी यांच्यासह ७० वर्षांवरील मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या कमी केल्या जाऊ शकतात!

पुढील लेख
Show comments