सोमवार, 22 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By

Yoga : मुलांचा परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी हे योगासन करून घ्या

yogasan
Yoga For Students During Exam : बोर्ड परीक्षेची वेळ आली आहे. मुलांना परीक्षेची तारीख समजल्यावर ते चिंता करायला लागतात. खासकरून जे मुलं पहिल्यांदा बोर्डची परीक्षा देणार आहे. त्यांना परीक्षेचा विचार करून खूप तणाव यायला लागतो. जशी परीक्षेची वेळ जवळ येते. अनेक मुलं आजारी पडायला लागतात. म्हणून परीक्षा आली की पालकांनी मुलांच्या जेवणाकडे तसेच खासकरून आरोग्याकडे लक्ष दयायला हवे. परीक्षेचा स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि अभ्यासात एकाग्रता वाढण्यासाठी मुलांना नियमित योगासनांची सवय लावा. 
 
भुजंगासन- या आसनाचे अनेक आरोग्यदायी लाभ आहेत. भुजंगासन करण्यासाठी पोटाच्या बाजूने सरळ झोपून पायांच्या मध्ये थोडे अंतर ठेवावे. आता हातांना छातीच्या जवळ नेऊन हातांना खाली टेकवावे. मोठा श्वास घेऊन नाभीला वरती उचला आणि आकाशाकडे पहावे. या मुद्रेत काही वेळ तसेच रहावे. या दरम्यान सामान्य श्वास घेत रहा. मग परत पहिल्या अवस्थेत या ही प्रक्रिया 3 ते 4 वेळेस करावी. 
 
पादहस्तासन- पादहस्तासनच्या आभ्यासाठी सरळ उभे राहून हातांना शरीरासोबत जोडून ठेवा. आता आतमध्ये श्वास घेऊन हातांना डोक्याच्या वरती न्या.  तसेच या दरम्यान वरती शरीराला ओढत ठेवा. आता श्वास सोडतांना मणक्याला सरळ करा. तसेच गुडघे  आणि हातांना सरळ ठेऊन पुढे वाका. आता हातांना जमिनीवर ठेवा. व टाचांना पकडण्याचा प्रयत्न करावा. 
 
ताड़ासन- आभ्यासासाठी मुलांंचे मन एकाग्र करण्यासाठी ताड़ासन योगाभ्यास करवुन घ्या. ताड़ासनमुळे मुलांची श्वासोच्छ्वास क्षमता वाढते. हे आसन करण्यासाठी सरळ उभे रहा. आणि पायांच्या मध्ये काही अंतर ठेवणे मोठा श्वास घेऊन दोन्ही हातांना वरती उचला. ताण देऊन टाच उचलून पायाच्या बोटांवर उभे रहावे.  या अवस्थामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयव ओढला गेल्याची जाणीव होते. काही वेळ या अवस्थेत थांबून पुन्हा  सामान्य स्थितीत परत या. या आसनाला 10 ते 15 वेळेस करावे. 
 
पर्वतासन- या आसनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी पद्मासनात बसून घ्या. आता दोन्ही हाताच्या बोटांना एकमेकात अडकवून श्वास घेत  हातांना वर घेऊन जा. शरीर आणि हातांना वर ओढा. शरीर वर ओढताना श्वास रोखून धरा . आता हळू हळू  श्वास सोडून आधीच्या स्थितीत या. 4 ते 5 वेळेस हे आसन करावे.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik