रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (11:29 IST)

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी 4 योगा टिप्स

surkutya
Remove Facial Wrinkles With Yoga: वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. अनेक वेळेस अधिक तणाव  किंवा प्रदूषणामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. सुरकुत्या आल्यामुळे व्यक्ती वयस्कर दिसायला लागतो. तर चला जाणून घेऊया सुरुकुत्या कमी कश्या कराव्या . 
 
1. पहिली योग टिप्स- 
चेहरा आणि कपाळ निवांत करा- पुष्कळ लोकांना बोलतांना, रागात असतांना, चिंता किंवा भावुक असतांना कपाळावर आठ्यां येतात. तसेच दूरचे पाहतांना, वाचन करतांना कपाळावर आठ्यां येतात. पुन्हा पुन्हा असे केल्यास त्या स्थायी स्वरुपाच्या होतात. लक्षात ठेवा की, कुठल्याही प्रकारची क्रिया करत असाल तर चेहऱ्यावर तणाव येत आहे का? असे वाटत असल्यास लगेच निवांत व्हावे. चेहऱ्याला पूर्ण सैल सोडणे. या करिता तुम्हाला अनुलोम-विलोमचा सराव करावा लागेल. मग यानंतर भ्रस्तिका आणि कपालभाति प्राणायाम करा. यामुळे शरीरात ऑक्सीजनची मात्रा वाढेल. जी आपल्या शरीराला ताजे तवाने व उत्साही करेल.
 
2. दूसरी योगा टिप्स- 
डोळे, भुवया, गाल, कान करिता अंग संचालन क्रिया- 
1. मानेला सरळ ठेऊन डोळ्यांच्या पापण्यांना चार वेळा  वर-खाली, डावीकडे- उजवीकडे फिरवा. मग सहा वेळा डावीकडे- उजवीकडे गोल फिरवा म्हणजे क्लाकवाइज आणि अँटीक्लाकवाइज. याला डांसिंग आय बॉल योग म्हणतात. 
2. आइब्रोच्या मध्यभागी अंगठा आणि तर्जनी बोटने पकडून हलकेसे दाब द्या  . 
3. तोंडात हवा भरून घेणे, हवेला चार वेळा  डावीकडे-उजवीकडे फिरवा. परत चार वेळा हवा भरा व बाहेर काढा. 
 
3. तीसरी योगा टिप्स- 
ब्रह्म मुद्रा करणे- ब्रह्म मुद्रामध्ये मान, चेहरा आणि डोळ्यांचा व्यायाम होतो. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. ब्रह्म मुद्राने मानेला लवचिकता येईल व मानेच्या जवळची चर्बी देखील कमी होईल. आता मानेला स्थिर करून  व डोळ्यांना डावीकडे-उजवीकडे, खाली -वर, गोलाकार फिरवा यामुळे डोळे सुंदर दिसतील.  
 
4. चौथी योगा टिप्स- 
काली मुद्रा करा- आपल्या जिभेला बाहेर काढणे व 30 सेकेंड तसेच रहाणे. यामुळे डोळ्यात जमलेले पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर निघतील. यामुळे डोळे स्वस्थ राहतात. यामुळे कपाळावरील आणि डोळ्याखालील सुरकुत्या कमी होतात. 
 
फिश फेस मुद्रा- या मुद्रेत गाल आतमध्ये घेऊन माशाप्रमाणे तोंडकरून आणि डोळ्याची उघडझाप करा. यामुळे कपाळावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 
 
बुद्धा फेस- शेवटी डोळे बंद करून विश्राम मुद्रेत बसणे आणि दोन्ही भुवयांच्या मध्ये ध्यान लावून बसणे. काही वेळापर्यंत असेच शांत बसणे.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik