Marathi Biodata Maker
✕

महावितरणचे आवाहन; धातूमिश्रित मांजा टाळा

Updated: सोमवार, 11 डिसेंबर 2017 (17:01 IST)

संक्रांतीनिमित्त लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र पतंग उडविताना उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. शहरासह ग्रामीण भागात वीज वितरणासाठी लघु व उच्च दाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. लहान मुले व युवकही वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवितात. अनेकवेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अतिउत्साही तरुण व लहान बालकेही असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीज तारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा दहा वर्षीय बालकाचा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांना धोक्याची पूर्वकल्पना देऊन त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करते.

सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातूमिश्रित रसायनांचे कोटिंग (आवरण) असल्याने वीज तारांच्या संपर्कात येताच या मांजात वीज प्रवाहित होऊ शकते. त्यातून दुर्घटनेसह वीज वितरण यंत्रणेत बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतणारे ठरू शकते तसेच वीज वाहिन्यांमध्ये पतंग अडकून शॉर्टसर्किट होऊन तासंतास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पतंग उडविताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हे लक्षात ठेवा

* वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतू शकते.

* वीज तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा अट्टाहास करू नका.

* वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका.

* धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा.

* दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

हंगामाची तयारी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी माती परीक्षण का करावे?

ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे १४,९७६ शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

LIVE: मुंबईकरांसाठी बीएमसीची नवी डिजिटल सुविधा! ‘हॅलो ए वॉर्ड’ एआय चॅटबॉट सुरू

CJP आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदेकडे

दिल्लीतील आंदोलकांच्या अटकेमुळे सोनम वांगचुक संतप्त, उपोषण आणि पायी मोर्चाचा इशारा

पुढील लेख
Show comments