Daily Horoscope
✕

बारामतीमध्ये ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी परिस्थितीचा आढावा घेतला

Updated: बुधवार, 16 सप्टेंबर 2026 (14:28 IST)
ALSO READ: महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ मिळणार, मॅग्नेट २.० मुळे आधुनिक कृषी पायाभूत सुविधांना गती मिळेल
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीमधून अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. आज सकाळी ४० शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. बसच्या पुढील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या भीषण अपघातात किमान चार ते पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, इतर विद्यार्थी धक्क्यात आहे. आज सकाळी, सुपे घाटावरून शाळेकडे जात असताना, घाट चढताना बसवरील नियंत्रण सुटले आणि ती उलटली. स्थानिक आणि वाटसरूंनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी चौफुला येथील खासगी रुग्णालय, हर्ष हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
 
चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. उर्वरित विद्यार्थी सुरक्षित असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, विद्याप्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त आणि खजिनदार युगेंद्र पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयालाही भेट दिली.
ALSO READ: ठाण्यातील राष्ट्रीय लोक अदालतीने मोठा दिलासा दिला, 7,001 प्रलंबित ई-चलन प्रकरणे निकाली काढली
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "आज सकाळी चौफुला-सुपे रस्त्यावर झालेल्या एसटी बस अपघाताची माहिती मिळताच, मी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. बसमध्ये सुपे येथील विद्या प्रतिष्ठान शाळेचे ३० ते ४० विद्यार्थी होते. काही विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या पाटास, चौफुला आणि लोणी काळभोर येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे."
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पंतप्रधानांचे शालेय मित्र असगर अली यांना मोठा दिलासा: मोदींच्या भेटीनंतर भाजप आमदाराने सोडला जमिनीवरील ताबा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

निवृत्तीच्या अफवांमुळे नितीन गडकरी नाराज; निवृत्तीच्या अफवांना स्वतःच पूर्णविराम दिला

LIVE: पुणे मॅरेथॉनमध्ये ५० लाख रुपयांच्या पेमेंटमध्ये अनियमिततेचे आरोप

टीम इंडिया पुढच्या महिन्यात एकदिवसीय मालिका खेळणार; रोहित आणि विराट सुद्धा दिसणार!

National Journalists Day 2026 : राष्ट्रीय पत्रकार दिन

भंडारा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments