रिक्षा चालकापासून स्वतःला वाचवायला तिने मारली चालत्या रिक्षातून उडी
रिक्षा चालकांचा त्रास अनेकदा प्रवासी वर्गाला होतो. असाच संतापजनक प्रकार शहरात घडला आहे. रिक्षा प्रवासात रिक्षाचालकाने गाडीत बसलेल्या तरूणीचा विनयभंग केला त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने स्वतःची अब्रु वाचविण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली आहे. त्यामुळे ही तरुणी जखमी झाली आहे. या गंभीर प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला पकडले आहे.
सविस्तर वृत्त असे की रिक्षाचालक शयित रिक्षाचालक रवि शंकर गोफणे (वय-22, रा. गौतमनगर, रामायण हॉटेल मागे, गरवारे पॉइर्ंट, अंबड, नाशिक) याच्या एम.एच.15Ak 6685 रिक्षा मधून घटनेतील पिडीत युवती गरवारे पॉइंट शेजारील आंगण हॉटेल, महाराष्ट्र बँकेसमोर्रोन सर्व्हिस रोडवरून जात होती, त्यावेळी रिक्षात कोणी इतर प्रवासी नसतांना गोफणे याने तरुणीला तिचा हात पकडत ‘तु, मुझे अच्छी लगती है.’ असे म्हणुन चालु गाडीत तिचा विनयभंग केला. मात्र त्याला खडसावत त्याला रिक्षा थांबविण्यास युवतीने सांगितले होते. मात्र, त्याने रिक्षा न थांबवता वेगात पुढे नेली त्यामुळे घाबेलेल्या तरुणीने जीव वाचवायला चालत्या रिक्षातून उडी मारली आहे. या घटनेत तिच्या चेहर्याला, उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. हा सर्व प्रकार रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात आला, काहींनी रिक्षाचा पाठलाग केला आणि त्या रिक्षाचालकाला पकडले व चांगलाच चोप दिला. त्यांतर या रिक्षाचालकाला पोलिसांच्या स्वाधिन केले. या प्रकरणातील जखमी युवतीला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी रिक्षा जमा करवून घेत त्यास ताब्यात घेतले व गुन्हा नोंदवला आहे.