Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉ. शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांची फेसबूक पोस्ट

Updated: बुधवार, 27 जानेवारी 2021 (07:45 IST)
अशी आहे गौतम करजगी यांची फेसबुक पोस्ट
प्राणप्रिय शीतल (सोना),
 
आज तुझा ४० वा वाढदिवस!
तू खूप दूर निघून गेली असलीस तरी अजूनही तू माझ्या जवळच आहेस,
तुला मिठीत घ्यावसं वाटतंय पण प्रिये…
तुला अशाप्रकारे येथून शुभेच्छा द्याव्या लागतील याची मी कधीच कल्पना केली नव्हती.
 
तू माझ्यासोबत नाहीस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय. आपण चाळीशीचे झाल्यानंतर पुढचं जीवन कसं व्यतीत करायचं याबाबत अनेक योजना आपण आखल्या होत्या. त्यातच आयुष्यात वर्षांची भर घालण्यापेक्षा वर्षांमध्ये आयुष्याची भर घालत जाणं जास्त महत्त्वाचं आहे, असं तुझं नेहमी सांगणं असायचं.
 
शीतल, तू माझ्यासाठी चमकता तारा राहिली आहेस आणि कायमच राहणार आहेस. तू मला आनंदवनाची ओळख करून दिलीस आणि त्याचवेळी अर्थपूर्ण जीवनाचं मोल काय असतं याची शिकवणही तू मला दिलीस. तू एक उत्तम लेक, मित्र, मार्गदर्शक, आई आणि पत्नी होतीस. बाबा आणि ताई यांनी जपलेल्या मूल्यांची तू सच्ची अनुयायी होतीस. मला आज खूप वेदना होत आहेत कारण ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. तुझ्यापासून सुटका करून घेण्यात ते यशस्वी ठरलेत खरे पण आनंदवनाला ते तुझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू कधीच मिळवली आहेस.
 
आज तुझ्या वाढदिवशी मी तुला वचन देतो की, तुला जसं अपेक्षित होतं तसंच मी शर्विलचं संगोपन करेन. तू तुझ्या आयुष्यात जी मूल्ये जपली आणि जगलीस ती सारी मूल्ये शर्विलमध्ये उतरतील, याची काळजी मी घेईन. मला खात्री आहे की, तू अशा कुटुंबात पुनर्जन्म घेशील, ज्यांना आपल्या लेकीची काळजी आहे. जी माया आणि प्रेम आईवडिलांकडून त्यांच्या लेकीला मिळणं आवश्यक असतं ते तुला तिथे निश्चितच मिळेल.
 
मी नेहमीच माझ्या चमकत्या तार्‍याची वाट पाहत राहीन
 
– तुझाच गौतम

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा'चा विजेता ! ब्रेकअप आणि १२ लाखांच्या सौद्यामागील कहाणी

तुम्हीही सायबर फसवणुकीचे बळी ठरला आहात का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "या नंबरवर तात्काळ फोन करा"

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments