रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (12:59 IST)

पतीने स्वप्नात बघितला नंबर, पत्नी लॉटरी जिंकून झाली मालामाल

अनेक लोकं स्वप्न बघतात आणि मग त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. स्वप्न खरे होतात असे देखील अनेकांचे म्हणणे आहे. पर आनंदी स्वप्न साकार झाल्यावर विश्वासच बसत नाही. अशीच घटना कॅनडात राहणाऱ्या डेंग प्रवातोडोम नावाच्या महिलेच्या बाबतीत घडली. महिलेच्या पतीने एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नामुळे दोघांचेही नशीब बदलून गेलं.
 
टोरंटोची राहणारी या महिलेच्या पतीने स्वप्नात एक नंबर पाहिला होता आणि त्या नंबरची लॉटरी डेंग यांनी खरेदी केली. ही लॉटरी त्या जिंकल्या असून यातून त्या मालामाल झाले आहेत. ओंटोरियो लॉटरी आणि गेमिंग कॉर्पोरेशन अनुसार यांनी 1 डिसेंबर 2020 ला स्वप्नात पाहिलेल्या नंबरचा वापर करून एक लॉटरी खरेदी केली होती ज्यातून सहा कोटी कॅनेडियन डॉलर म्हणजे 344 कोटी रुपये जिंकल्या आहेत.
 
विजेते महिलेने सांगितले कीत्यांच्या पतीने दोन दशकांआधी काही नंबर्सबाबत एक स्वप्न पाहिलं होतं आणि जॅकपॉट जिंकण्यासाठी तेव्हापासून त्या त्याच नंबरचा लॉटरी खरेदी करीत होत्या. डेंग आणि त्यांचे पती गेल्या 40 वर्षांपासून एक सामान्य मजूर म्हणून काम करत आहेत पण खूप मेहनत घेऊन देखील पैसे बचत करू शकत नव्हते. कोरना काळात परिस्थिती अजूनच वाईट झाली आणि त्यांची नोकरी गेली. अशात आता या लॉटरीच्या पैशातून त्यांना आधार ‍मिळाला आहे. 
 
डेंग म्हणाल्या की हे लॉटरीचे पैसे मिळाल्यावर त्यांचे दोघांचा आयुष्य सुखकर होईल आणि मुलाचे शिक्षण पूर्ण करता येईल तसेच या पैशांनी आता गाडी आणि घर देखील खरेदी करता येईल.