शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (08:27 IST)

शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान

MP Sanjay Raut
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.“होय, संघर्ष करणार” अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. येथून पुढे उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
दुसरीकडे, संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं जात असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे.