गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2018 (09:12 IST)

'डरकाळी फोडणारा वाघ' परतला

डरकाळी फोडणारा वाघ ही शिवसेनेची मूळ निशाणी आहे.मात्र  काळाच्या ओघात वाघ काहीसा मागे पडलेला दिसतो. पुढे  शिवसैनिकांनी धनुष्य बाण हाती घेतले. पण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वाघ अंगठीरूपानं परतलाय. 

कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या कृष्णा पवळे या शिवसैनिकानं चक्क वाघाची अंगठी बनवलीय. खासदार अरविंद सावंत आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते सोमवारी या वाघाच्या अंगठीचं शिवसैनिकांना वाटप करण्यात आलं. वाघाच्या अंगठीमुळं शिवसैनिकांतला आत्मविश्वास आणखी बळावेल, असा विश्वास सावंत यांनी बोलून दाखवला.