शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुन्हा ‘सामना’मधून भाजपवर निशाणा

Shivsena Samna news paper
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ‘मातोश्री’वर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र, मातोश्रीतून बाहेर पडताच पुन्हा ‘सामना’मधून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

‘महाराष्ट्राची सत्ता टिकेल पण काश्मीर टिकेल काय?’, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. दरम्यान, आज शिवसेनेचा 51वा वर्धापन दिवस आहे आणि वर्धापनदिनी मित्रपक्षावर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं आहे. ‘महाराष्ट्राचे सरकार हे प्राधान्य असता कामा नये. आश्वासनांच्या टोप्या लावून व या बोटावरील थुंकी त्या बोटावर करून ते टिकवले जाईलही, पण कश्मीर कसे टिकविणार आहात?’ असा सवाल विचार सामनातून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.