गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (15:22 IST)

नाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग

shivshahi bus
नाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला.
ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.
या प्रवासी बसमध्ये 43 प्रवासी हे प्रवास करत होते.
ही बस ही पिंपरी चिंचवड डेपोची असून चालक वाहक यांच्याबरोबर संपूर्ण प्रवासी सुखरूप असून कुणालाही काही इजा झाली नाही. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे प्रवासी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला.
या बसने इतक्या मोठ्या प्रमाणावर आगीने रुद्र रूप धारण केले होते की परिसरामध्ये सर्वत्र धूर दिसून येत होता. या मार्गावरून जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस, नांदूर पोलीस, ॲम्बुलन्स सुविधा सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी सहकार्य केले. सिन्नर येथील नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राने व एमआयडीसी येथील अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित या ठिकाणी धाव घेऊन बचाव कार्य हाती घेतले मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप काढून आपापल्या मार्गाने त्यांना पुढील प्रवासासाठी सोडण्यात आले.
Edited by : Ratnadeep Ranshoor