Daily Horoscope
✕

एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, आजपासून आंदोलन तीव्र

Updated: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (10:47 IST)
 
राज्य मार्ग परिवहन मंडळाची बिघडलेली आर्थिक घडी, तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे अनिश्चित वेतन, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, प्रलंबित महागाई भत्ता अशा अनेक मागण्यांसाठी परिवहन मंत्र्यासोबत पार पडलेल्या बैठकीतही कोणताही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे.
 
बुधवार सकाळपासूनच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या दिवाळीपूर्वी मान्य व्हाव्यात, यासाठी एसटीच्या विविध कामगार संघटनांनी एकजूट दर्शवते बेमुदत उपोषण सुरू केले. गेल्या मागील दीड वर्षापासून एसटीचा आर्थिक डोलारा पूर्णतः ढासळला असून प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यात डिझेलच्या किमती वाढल्याने एसटी बसचा दैनंदिन खर्च भागवणेही कठीण होत चालले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मागील वर्षभरापासून राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. 
 
बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक, महाराष्ट्र एसटी कामगार सेना व कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. डिझेलच्या वाढलेल्या किमती, तसेच राज्य शासनाकडून मिळणारी तुटपुजी मदत, त्यात दिवाळीनंतर मार्ग काढू असे म्हणून सद्यस्थिती आणखी विदारक होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात एसटी सेवा बंद होऊन वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, असेही तिगोटे यांनी यावेळेस स्पष्ट केले.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

पूर्वांचल द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात ३ टेनिसपटूंचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्रातील आश्रम शाळांमधील अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी नऊ सदस्यीय समिती करणार

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे प्रमुख निर्णय; पोलीस दलाचा सन्मान, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये भरीव वाढ

"पुणे बंद तर करून दाखवा... महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना खुले आव्हान"

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट अधिक गडद; सरकारने २६५ तालुक्यांमध्ये पीक पंचनामे करून सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments