Festival Posters
✕

विदर्भामध्ये वादळी पाऊस आणि गारपीटचा इशार

Updated: सोमवार, 9 मार्च 2020 (10:08 IST)
 
अरबी समुद्रातून सध्या वारे वाहत आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश ते तमिळनाडूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. प्रामुख्याने विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडय़ातील काही भागातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भामध्ये १० ते १२ मार्च या कालावधीत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 
दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा किंचितसा वाढत असला, तरी अद्यापही राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंशांनी खाली आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवत नाही. रात्रीचे किमान तापमानही अनेक ठिकाणी सरासरीच्या खाली आल्याने रात्री आणि पहाटे गारवा जाणवतो आहे. रविवारी नाशिक येथे नीचांकी १२.३ अंश किमाल तापमानाची नोंद झाली. पुणे, जळगाव, सातारा आदी भागातही रात्री गारवा आहे. मुंबईतही कमाल आणि किमान तापमान सरासरीखालीच आहे. मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, औरंगाबाद येथेही रात्रीचे तापमान सरासरीखाली असल्याने काहीसा गारवा आहे. विदर्भातही अद्याप अकोला वगळता कुठेही उन्हाचा चटका नाही.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

LIVE: ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझ्या मनात कोणताही द्वेष नाही, व्यासपीठावर बोलताना संजय राऊत म्हणाले

Rule Change 1 Nov उद्यापासून CNAP सेवा लागू! अनधिकृत कॉल्सचा गेम ओव्हर, फोनवर आता थेट दिसेल कॉलरचे खरे नाव

एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी

पुढील लेख
Show comments