Daily Horoscope
✕

'बेटी बचाव बेटी पढ़ाओ' साठी जांगड़ा धावले नाशिक ते शिर्डी

Updated: शनिवार, 2 डिसेंबर 2017 (17:22 IST)

समाजातील विघातक प्रथांमुळे आज मुलीची संख्या कमी होत असून ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे मुलींची भृन अवस्थेत हत्या न होता. त्यांना जीवन जगण्याचा अधिकार मिळावा तसेच त्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी बेटी बचाव, बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी आज नाशिक ते शिर्डी धावलो असून यापुढीलही काळात यासाठी प्रयत्न सुरु राहतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 प्रारंभी त्यांचे सिन्नर, पांगरी व त्यानंतर शिर्डी येथील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. याठिकाणी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिर्डी येथे शिर्डी संस्थान चे ट्रस्टी सचिन तांबे यांनी स्वागत केले. तर सिन्नर व पांगरी येथे मुकेश चव्हाणके, राजेंद्र रायजादे, डॉ.संदीप मोरे, राहाभाऊ लोणारी, महेंद्र कानडी, सुदाम लोंढे, सुरजराम आदीनी त्यांचे शहरात स्वागत केले.

यावेळी त्यांच्या सोबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, राजेश चौधरी, प्रदीप गुप्ता, सुनील हिरे, भरतभाई पटेल, राहुल जांगडा, संजू राठी, नरेश चौधरी,  गणेश चौधरी आदी सहभागी झाले होते.

सुभाष जांगडा यांचा परिचय 

सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून कोलकत्ता रोडवेजचे ते भागीदार आहे. गेल्या दोन वर्षापासून ते नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतुन नेहमी समाज उपयोगी वेगळे कार्यक्रम  राबवित असतात. ते गोल्फ क्लब नाशिकचे सदस्य आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

अंडर-१९ आशिया चषकावर भारताची मोहोर; अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

रुपाली चाकणकर यांचे नाव आणि फोटोचे 'ट्रेडमार्क' रजिस्ट्रेशन; विनापरवाना वापरावर कारवाईचा इशारा

राज्यात थंडीचा कडाका वाढला; धुळ्यात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Birsa Munda Jayanti 2026 Wishes in Marathi बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

पुढील लेख
Show comments