शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (15:55 IST)

येत्या १ मार्चपासून असहकार आंदोलन, सुकाणू समितीचा इशारा

येत्या १ मार्चपासून राज्यात असहकार आंदोलनाचा इशारा  सुकाणू समितीने दिला आहे. याबाबत शेतकरी सुकाणू समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे . त्यामुळे पुन्हा एकदा कर्जमाफी आणि हमीभाव मागणीसाठी शेतकरी पुन्हा संपावर जाण्याची शक्यता आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलंय. असहकार आंदोलनात कर्जाचे हप्ते तसंच विजेचं बिल भरण्यात येणार नाही. तसंच शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारतील, असा इशाराही सुकाणू समितीने यावेळी दिला. त्यामुळे राज्य सरकारची शेतकरी प्रश्नावर कोंडी होण्याची शक्यता आहे.