suvichar

सुप्रिया सुळे दहा वर्षांनी निवडणुका लढवणार नाही विद्यार्थिनीला दिली लोकसभेची ऑफर

सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (10:01 IST)
पुणे येथील बारामती मतदार संघातील सहा तालुक्यातील विद्यार्थीनींना 6 हजार सायकलींचे वाटप कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी विद्यार्थीनींशी संवाद साधताना त्यांना मोठे झाल्यावर काय व्हायचे असा प्रश्न, खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारल होता, त्यावेळी मुळशी तालुक्यातील एक विद्यार्थीनी मला खासदार व्हायचंय आहे असे त्यांना सांगितलं; यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी १० वर्षांनी निवडणूक लढवणार नाही, तेव्हा मी तुला संधी देईल असे म्हणत विद्यार्थीनीला लोकसभा लढवण्याची ऑफर दिली आहे. तर तू आताच पावर साहेबांना तुझे नाव संग ते तुला तिकीट देतील असा सल्लाही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बारामती तालुक्यातील विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी टाटा ट्रस्टचे तारापाेरा सुद्धा उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या की तुम्ही सांगा  मी कुठल्या भाषेत भाषण करु मराठी, इंग्रजी या भाषा विद्यार्थीनी सांगत असताना काही विद्यार्थीनी हिंदी म्हणाल्या, तेव्हा तुम्हाला लो कसभा लढवायची आहे का म्हणून हिंदीत बोला म्हणताय असा मिश्किल प्रश्न देखील त्यानी केला. सुळे म्हणाल्या, बारामती मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत 25 हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. यातील 10 टक्के सायकल या आशा वर्करला देण्यात आल्या. टाटा ट्रस्टने सायकल उपलब्ध करुन दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानते असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: २७ जिल्ह्यांवर मुसळधार पावसाचे सावट; विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला

छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर जंगली हत्तींचा कळप ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे सरकला; वन विभागाने अलर्ट जारी केला

पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची फसवणूक; ७०० नोकऱ्या गेल्या, रातोरात कंपनी बंद झाली

अन्नामध्ये भेसळ आढळल्यास थेट तक्रार दाखल करा; आयएएस तुकाराम मुंडे यांनी टोल-फ्री क्रमांक आणि ईमेल जारी केला

पुण्यात नाशिकसारखे टीसीएस प्रकरण उघडकीस! विप्रोमध्ये महिलेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव

पुढील लेख
Show comments