Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिक्षक बदली प्रकरण २५ लाख रुपये घेवून खोटे नियुक्ती आदेश

Updated: सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (16:14 IST)
 
लातूरच्या खणी विभागातील तुळशीराम शिंदे प्राथमिक शाळेचे संस्थाचालक राजेंद्र तुळशीराम शिंदे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती महानंदा उस्तुरगे, या शाळेतील शिक्षक तथा संस्थाचालकाचे नातेवाईक गणपती राम माने यांच्यासह शिक्षक संघटनेचे मोहन हाके, भगवान बिरादार, सुर्यकांत बिरादार यांनी या शाळेत शिक्षकपदाची कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सतीश बाबुराव ढगे या युवकाकडून २५ लाख रुपये उकळले. इतकेच नव्हे तर शिक्षणाधिका-यांच्या बनावट सहीचे शिक्षक नियुक्तीचे बोगस शासन आदेशही त्यास दिले. ही बाब लक्षात आल्यानंतर या युवकाने वडिलांची पेन्शन आणि शेतमाल विकून आपण हे पैसे दिलेले असून ते परत मिळावे अशी विनवणी संस्थाचालकाकडे केली. पण पैसे देणे तर दूरच, उलट सतीश ढगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येऊ लागली. त्यानंतर ढगे यांनी पोलिसांकडे धाव घेऊन रितसर तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९४ कलम ४२०, ४६८, ४७१, ५०६ प्रमाणे वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश ढगे हा कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील भालकी येथे डीएड झालेला युवक असून कायम नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने त्याने या शाळेत तब्बल पाच वर्षे बिनपगारी नोकरीही केली आहे.  

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

५३ जणांच्या मृत्यूंनंतर, इंडोनेशिया पुन्हा एकदा ५.९ तीव्रतेच्या भूकंपाने हादरला

बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; भारताच्या WTC समीकरणावर काय परिणाम?

World Badminton Championship: भारतामध्ये १७ वर्षांनी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप; सिंधूसह 'या' खेळाडूंवर नजर

वंदे मातरम' गायनात व्यत्यय आणल्याप्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल

Cristiano Ronaldo Retirement: रोनाल्डोने निवृत्तीचे संकेत दिले

पुढील लेख
Show comments