बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (09:35 IST)

अवनीला बेकायदेशीररित्या ठार मारले : मेनका गांधी

menka gandhi
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत १३ जणांचा जीव घेणाऱ्या अवनी या नरभक्षी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला व कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला.
 
शार्प शूटर असगर अली याने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या आदेशावरून अवनीच्या केलेल्या हत्येला मेनका गांधी यांनी पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले. गांधी यांनी केलेल्या टिष्ट्वटमध्ये वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रामुख्याने उपस्थित केले आहे. गांधी म्हणाल्या की, वाघिणीला बेशुद्ध करून न पकडता थेट गोळी मारण्यात आली. वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मी कायदेशीर, गुन्हेगारी व राजकीय प्रश्न म्हणून उपस्थित करील.