गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (11:21 IST)

सरकारी ऑफीसमध्ये जीन्स पॅण्टवरची बंदी उठवली

अत्यंत सोयीच्या असलेल्या डेनिमवर राज्य सरकारनं बंदी घातल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता सरकारी ऑफीसेसमध्ये जीन्स पॅण्टवरची बंदी उठल्यानं कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याआधी डिसेंबरमध्ये सरकारनं एक आदेश काढून सरकारी कार्यालयांमध्ये जिन्स वापरण्यावर बंदी आणली होती. 
 
जिन्ससोबत टी शर्ट, गडद रंगाचे, विचित्र नक्षीकाम असलेले कपडे घालून कार्यालयात येऊ नका असं आदेशात म्हटलं होतं. पुरूषांसाठी ट्राऊझर पॅण्ट, साधा शर्ट तर महिलांसाठी साडी किंवा सलवार, चुडिदार असा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला होता. 
 
मात्र आता सरकारनं या निर्णयात थोडा बदल केला असून जिन्स वापराला परवानगी दिलीये. सरकारी कर्मचारी आणि संघटनांनी याचं स्वागत केलं आहे. जिन्स वापराला परवानगी मिळाली असली तरी अन्य ड्रेसकोड मात्र कायम आहे. टीशर्टसह रंगीबेरंगी कपडे घालण्यावर बंदी कायम आहे.