1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (07:19 IST)

वाचा, मुख्यमंत्री यांनी जनतेशी संवाद साधताना खालील मुद्दे मांडले

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना खालील मुद्दे मांडले : 
मधल्या काळात आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यात यशस्वी झालो होतो. पण आपण सगळे हातात हात घालून लढलो म्हणून ते शक्य झाले.
संपूर्ण जगाचीच परिस्थिती दोलायमान आहे.
……………………
मधल्या काळात आपण शिथील झालो. शस्त्र टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मी तेव्हाही सांगत होतो, की थोडा धीर धरा. 
जी भीती मलाच नव्हे, तर या विषयातल्या तज्ज्ञांना वाटत होती, ती खरी ठरली.
हा विषाणू नवा अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकत आहे आणि आपली परीक्षा पाहात आहे.
…………………..
कोविडची साथ सुरू झाली तेव्हा या विषाणूंची चाचणी होऊ शकते अशा दोनच प्रयोगशाळा राज्यात होत्या
आज त्या चाचण्या करणाऱ्या जवळपास ५००लॅब्ज आपण तयार केल्या आहेत.
मुंबईत दररोज सुमारे ५०००० चाचण्या करत आहोत.
महाराष्ट्रामध्ये दर दिवशी चाचण्या करण्याची क्षमता आपण जवळपास १८२००० पर्यंत नेली आहे
………………………………
येत्या काही दिवसांत दररोज चाचण्यांची संख्या अडीच लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
केंद्राच्या नियमावलीनुसार ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर पद्धतीने केल्या जातील.
चाचण्या करताना आपण दर्जाशी तडजोड करत नाही आणि करणार नाही.
मुख्य म्हणजे आपण एकही रूग्ण लपवलेला नाही आणि लपवणार नाही.
…………………………
महाराष्ट्रातल्या बेड्सची संख्या १०००० पेक्षा कमी होती. आता ती संख्या पावणेचार लाखांपर्यंत नेली आहे
मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीला दर दिवशी ३००-३५० रुग्ण सापडत होते. आज ती संख्या एका महिन्यात ८५०० वर गेली आहे
विलगीकरणासाठी २,२०,००० बेड्स असून त्यापैकी ६२ टक्के बेड्स भरले आहेत.
………………………
आयसीयू बेड्स २०५१९ आहेत व ते ४८ टक्के भरलेले आहेत.
ऑक्सिजनचे बेड्स ६२ हजारांच्या आसपास आहेत आणि आज २५ टक्क्यांच्या आसपास भरलेले होते.
व्हेंटिलेटर्स ९३४७ आहेत आणि ते पण जवळपास २५ टक्क्यांच्या जवळपास भरलेले आहेत. 
ही परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधा लवकरच अपुऱ्या पडतील.
………………………
व्हेंटिलेटर्स, बेड्स, औषधांचा साठा, ऑक्सिजन इत्यादी सुविधा आपण वाढवू
पण डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची संख्या कशी वाढवणार
आरोग्यसेवेत काम करणाऱ्या अनेकांना कोविड होऊन गेला.पण बरे झाल्यानंतर ते लगेच सेवेत रूजू झाले आहेत. त्यांना किती त्रास द्यायचा याचा विचार करायला हवा.
…………………………..
लसीकरणात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य ठरले. काल एका दिवसात ३ लाख लसीकरण केले. 
केंद्राने लसींचा पुरवठा वाढवला तर लसीकरणाची क्षमता एका दिवसात ६ ते ७ लाखांपर्यंत नेऊ. 
लस घेतल्यानंतरही काही जण कोरोनाने बाधित होतात. कारण लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे पण बरेच जण हे पाळत नाहीत
………………………..
जे म्हणतात की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, माझं म्हणणं आहे की जरूर उतरा पण लॉकडाऊनच्या विरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात उतारा.
डॉक्टरांना मदत करायला रस्त्यावर उतरा, ज्या कुटुंबांमध्ये कर्त्या-करवित्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावर उतरा.
………………………….
आपली यंत्रणा एका बाजूला ट्रेसिंग,ट्रॅकिंग, टेस्टिंगमध्ये बिझी आहे. दुसरीकडे उपचार आहेत,तिसरीकडे हीच यंत्रणा लसीकरण करतेय. 
हे सगळं एकत्रित आल्यानंतर त्यांची काय स्थिती होत असेल याचा आपण विचार करायला हवा.
मास्क न वापरण्यात शूरता नाही, मास्क लावायला लाजायची सुद्धा काही गरज नाहीए.
…………………….
लॉकडाउन आपण टाळू शकतो, पण ज्या जिद्दीने पहिल्यांदा लढलात, त्या जिद्दीनं पुन्हा एकदा लढायला हवं.प्रत्येकानं मी कोरोनाला हरवणार की नाही, रोखणार की नाही हे ठरवलं पाहिजे.
अजूनही कोरोनानं आपल्यावर मात केलेली नाही आणि मी करूही देणार नाही. पण ही मात करताना जर आपण घट्ट उभे राहायला हवे.
………………………
सरकार जी पावलं उचलतं आहे, ती जनतेच्या हितासाठी उचलतं आहे. अर्थचक्र फिरवायचं आहे, गरीबाची रोजीरोटी वाचवायची आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला त्यांचे जीव वाचवायचे आहेत.
मी तुमच्या कुटुंबातला एक आहे. तुम्ही मला कुटुंबीय मानलं आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, म्हणजे माझे कुटुंब तुम्ही आहात.
……………………….
माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतल्यानंतर मला टीकेची पर्वा नाही
सरकार यंत्रणेच्या बाबतीत कुठेही कमी पडलेलं नाही,कमी पडू देणार नाही. सरकार खंबीर आहे. आरोग्यसुविधा कुठेही कणभरही कमी पडू देणार नाही.
मात्र, टाळी एका हाताने वाजणार नाही. हात हातात घालून जेव्हा आपण काम करू तर आणि तरच यश मिळेल
…………………
मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत आहे,लॉकडाऊन जाहीर करत नाहीए, पण दोन दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊ. 
मला आपल्या सहकार्याची अपेक्षा नाही विश्वास आहे.
सर्व राजकीय पक्ष, सर्व धर्मियांचे सहकार्य अपेक्षित आहे. 
ही लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा.