रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड
रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. आता काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पडकले आहे. नाशिकमध्ये के के वाघ कॉलेजवळ रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा म्होरक्याला पोलिसांनी पकडले आहे. पालघरमधून कंपनीत काम करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजर होत होता. याआधी काही लोकांना पकडण्यात आले आहे. यात महिलांचा समावेश आहे. या महिला परिचारक म्हणून काम खासगी रुग्णालयात काम करत होत्या.
पालघरमधून मुख्य सुत्रधाराकडून 63 इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. यात लेबल नसलेले 62 तर 1 इंजेक्शन लेबल असलेले आहे. आतापर्यंत या टोळीकडून 85 इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत. महिनाभरात विविध गुन्ह्यात नाशिक जिल्ह्यात 110 इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.