नाशिकला मिळणार १०० मे.ट. ऑक्सिजन, २००० रेमडेसिवीर, भाजप नेत्यांचे मुंबईतील आंदोलन यशस्वी

oxygen
Last Modified शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (07:59 IST)
नाशिक जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सापत्न वागणूक मिळत असल्याचा निषेधार्थ भाजप नेते एकवटले आहेत. त्यामुळेच महापौर, आमदार आणि खासदारांसह भाजप नेत्यांनी थेट मुंबईत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

वाढत्या रुग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही सरासरी ४०० ते ५०० रेमडीसीवर इंजेक्शनचा पुरवठा नाशिक जिल्ह्याला होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही. तसेच नाशिक जिल्ह्यासाठी १२५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असतांना तो फक्त सरासरी ७० मेट्रिक टनच मिळत आहे. परिणामी, अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावत आहेत.

या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महापौर सतीश कुलकर्णी, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गीते, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक प्रशांत जाधव, सभागृह नेते सतिश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील यांनी एफडीएचे सेक्रेटरी विजय सौरभ यांचेशी चर्चा केली. त्यांना नाशिक जिल्ह्याची परिस्थिती अवगत केली व जो पर्यंत ह्यावर योग्य तोडगा निघत नाही, तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका सर्व शिष्टमंडळाने घेतली. त्याची दखल घेत नाशिकसाठी १०० मेट्रिक टन ऑक्सिजन आणि सुमारे २००० रेमडीसीवर इंजेक्शन नाशिक जिल्ह्यास देण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले.
तसेच ही बैठक चालू असतांना एफडीएचे आयुक्त परिमल सिंग, एफ डी. ए. महाराष्ट्र उपायुक्त विजय वाघमारे, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचेसह
सर्व शिष्टमंडळाची तातडीने व्हिडिओ कॉफरन्स घेणात आली. नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी वाढीव रेमडीसीवर व ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन घेण्यात आले. यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक रुग्णांची हेळसांड थांबणार असून त्यांना पुरेशा प्रमाणात उपचारासाठी रेमडीसीवर व ऑक्सीजन मिळण्यास मदत होणार आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

IPL 2022 RR vs RCB, Qualifier 2 : राजस्थान रॉयल्स अंतिम ...

IPL 2022 RR vs RCB, Qualifier 2 : राजस्थान रॉयल्स अंतिम फेरीत
IPL 2022 RR vs RCB, क्वालिफायर 2 : राजस्थानने 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजयी ...

हे झाड कोणत्या टेन्शनमध्ये आहे? 'द थिंकिंग ट्री' 1500 ...

हे झाड कोणत्या टेन्शनमध्ये आहे? 'द थिंकिंग ट्री' 1500 वर्षांपासून मानवासारखा काहीतरी विचार करत आहे
माणसांप्रमाणेच झाडांमध्येही जीव असतो. ही वस्तुस्थिती आपणा सर्वांना माहीत आहे पण झाडांना ...

नवनीत राणांच्या तक्रारीची दखल; पोलीस महासंचालक, आयुक्तांना ...

नवनीत राणांच्या तक्रारीची दखल; पोलीस महासंचालक, आयुक्तांना संसदीय समितीची नोटीस
नवनीत राणांच्या तक्रारीची संसदेच्या समितीकडून दखल घेण्यात आली आहे. पोलीस महासंचालक आणि ...

अविनाश भोसले 30 मे पर्यंत नजर कैदेत; CBI कोर्टाचा निर्णय

अविनाश भोसले 30 मे पर्यंत नजर कैदेत; CBI कोर्टाचा निर्णय
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयने DHFL घोटाळा प्रकरणात अटक केली ...

....म्हणून शरद पवारांनी दगडूशेठ हलवाई मंदिरात जाणं टाळलं"; ...

....म्हणून शरद पवारांनी दगडूशेठ हलवाई मंदिरात जाणं टाळलं
शरद पवार दर्शन न घेताच निघून गेल्याने चर्चांना उधाण