शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (15:49 IST)

विद्यमान सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे सरकार कोसळणार, आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक विधान केले

aditya thackare
शिवसेना पक्षाची जबाबदारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. आज मनमाड दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यमान सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे सरकार कोसळणार आहे, असे खळबळजनक विधान केले आहे.
 
आधी अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट, नंतर एकनाथ शिंदेंनी सांगितलं फोन कॉल करण्यामागचं नेमकं कारण; म्हणाले…
शिवसैनिकांना उद्देशून बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकार लवकरच कोसळेल असा दावा केला. “हे सरकार बेकायदेशीर पद्धतीने बनवले गेले आहे. हे सरकार कोसळणार आहे, हे तुम्ही लिहून घ्या. हे थोड्या दिवसांचे सरकार आहे. हे सरकार गद्दारांचं आहे. हे तात्पुरतं सरकार आहे” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
 
“हे चाळीस लोक (शिवसेनेचे बंडखोर आमदार) नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. माझ्या चेहऱ्यावर स्वभिमान होता, हसू होतं. कारण मी यांच्यासारखा बेईमान झालो नाही. गुंडगिरीचा काळ गेला. लोकांची सेवा करा, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. पण लोकांना फसवत राहिलात, खोटं बोलत राहिले तर हेच लोक तुम्हाला गाडतील,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.