मनमाडच्या एफसीआय गोडाऊन मध्ये चोरी
नाशिक :भारतीय खाद्य निगम (एफसीआय)चे भव्य गोडाऊन मनमाड शहरालगत आहे. विशेष म्हणजे, आशिया खंडातील नंबर दोनचे धान्य साठवणूक गोदाम अशी त्याची ओळख आहे. याच गोडाऊनमधून आता चक्क तांदळाच्या गोण्यांची चोरी झाली आहे. त्यामुळे मोठीच खळबळ उडाली आहे.
एफसीआय गोडाऊन मधून केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या विविध भागात अन्न धान्य पाठवले जाते. तसेच, अनेक भागातून अन्न धान्य येथे साठवणुकीसाठी आणले जाते. विशेष रेल्वेची जोडणीही या गोदामाला आहे. म्हणजेच रेल्वेद्वारेही येथे धान्य साठवणुकीला येते. किंवा येथून पुरवठ्यासाठी नेले जाते. याच गोडाऊनमधून तांदळाच्या ५५ गोण्या या चोरीला गेल्या आहे. या चोरीप्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा असताना या ठिकाणाहून चोरी कशी झाली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
आशिया खंडातील नंबर दोनचा धान्य साठवणूक गोडाऊन म्हणून मनमाडच्या एफसीआयची ओळख आहे. या ठिकाणावरून राज्यातील अनेक भागांमध्ये तांदूळ आणि गहूचा पुरवठा हा ट्रक द्वारे केला जातो. या गोदामात कडक सुरक्षा आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor