Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी कालमर्यादेचे बंधन नाही-राहुल नार्वेकर

Updated: सोमवार, 10 जुलै 2023 (21:46 IST)
 
आपण नोटीसा दिलेल्या प्रत्येक आमदारांची सुनावणी घेणार आहोत. अपात्रतेबाबत मी निर्णय दिल्यावरच संबंधिताना न्यायालयात जाता येईल असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या मागणीवर सुयोग्य वेळेत निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालायने ११ मे २०२३ च्या निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालाला पुढील महिन्यात १० ऑगस्ट रोजी तीन महिने पूर्ण होतील. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार अपात्रेबाबत तीन महिन्यांत निर्णय घ्यावाच लागेल असे म्हटले आहे.
 
याबाबत शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडून ७ जुलैला शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ५३ आमदारांना अपात्रतेबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक आमदाराला वेळ देऊन प्रत्यक्ष सुनावणी घेणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: नितीन गडकरी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले!

हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही', शाळेत हिजाब घालण्याची याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली

गर्लफ्रेंडकडून गाडीवर 3400 किस; पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता थेट जमा

भिकारी महिलेच्या मृत्यू नंतर घरातून एकूण ८.४० लाख रुपये किमतीच्या नोटा आणि नाण्यांनी भरलेल्या ३० हून अधिक गोण्या सापडल्या

पुढील लेख
Show comments