शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 मे 2023 (12:02 IST)

चिपळूण :बैलगाडी स्पर्धेला गालबोट, चिमुकल्याच्या अंगावरून बैल गेला

चिपळूण : चिपळूण तालुक्यात कळमुंडी येथे बैलगाडाच्या स्पर्धेला गालबोट लागले आहे. अंगावरून बैलगाडा गेल्यामुळे पाच वर्षीय चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली आहे. सदर घटना चिपळूण तालुक्यातील कळमुंडी येथे बैलगाडा शर्यती दरम्यान घडली आहे. स्पर्धेत बैल उधळला आणि एका पाच वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावरून गेल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराडच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. हा मुलगा चिपळूणच्या कोंढे गावातील असून बैलगाडी स्पर्धा बघण्यासाठी आला होता. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली असून राज्यभरात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी या स्पर्धेत होणारी गर्दी चिंतेचा विषय होत आहे. या पूर्वी देखील बैलगाडा स्पर्धेला अलिबाग येथे गालबोट लागले होते. दोन महिन्यापूर्वी स्पर्धेत एका इसमाचा मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता. तर आज पुन्हा एका चिमुकल्याला बैलाने तुडवले त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit