मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (18:01 IST)

Jalgaon News एकाचवेळी तीन भावांचा मृत्यू

Three brothers died simultaneously श्रावण सोमवार  निमित्तजळगाव जिल्ह्यातील रामेश्वर तीर्थक्षेत्रावर  कावड यात्रेत सहभागी होण्यापूर्वी नदीत अंघोळीसाठी गेलेले तीन तरुण तापी नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 
 
एकाच वेळी शिंपी कुटुंबियातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पियुष रवींद्र शिंपी, सागर अनिल शिंपी, अक्षय प्रवीण शिंपी अशी या तिघांची नावे आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजता भगव्या चौकापासून वाजत गाजत रामेश्वर येथे कावड यात्रेला निघाली. ही यात्रा रामेश्वर येथे दोन वाजेच्या सुमारास पोचली. तेथे तरुणांनी रामेश्वर मंदिरात दर्शन घेतले.  सर्व पूजा अर्चा झाली. त्यानंतर पियुष, सागर आणि अक्षय हे तिघेही पोहण्यासाठी तापी नदीपात्रात उतरले. त्यावेळी एकजण वाहून जात असल्याचे इतर दोघांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तिघेही पाण्याच्या प्रवाहात (Drowned) वाहून गेले. 
 
यावेळी नदी काठावर असलेल्या काही जणांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत ते तिघेही वाहून गेले होते.  तिघांचा शोध सुरू असताना संध्याकाळी पाच वाजेदरम्यान त्रिवेणी संगमानजीक एका तरुणाचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्याच्या काही अंतरावर दुसरा मृत्यू सापडला. तर आज सकाळी तिसरा मृतदेह पथकाच्या हाती लागला आहे.