बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2017 (15:42 IST)

नववर्ष सुट्टी : कोकणात जाताय मग हे वाहतुकीचे नियम वाचा

नविनवर्ष आणि ३१ डिसेंबर साठी कोकणात जात असाल तर हे नवीन वाहतुकीचे नियम माहिती करवून घ्या, कारण कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच सोबत आलेल्या पर्यटकांचे मोठे हाल होतात. हा नेहमीचच अनुभव पाहता पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातून जाणा-या मुंबई-गोवा आणि  मुंबई-पुणे महामार्गासह प्रमुख रस्त्यावरील अवजड वाहतूक ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत पूर्ण बंद आहे. अर्थात हा नियम ३० डिसेंबरला सकाळी सात वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला देखील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून रस्त्यावरील अवजड वाहनं पेट्रोल पंप येथे उभी ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होणार नाही आणि वाहतूक खोळंबा होणार नाही. तर दुसरीकडे अनेक पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी जातात त्यामुळे सुरक्षेसाठी दृष्टीने समुद्र किनारी सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत जीवरक्षक तैनात ठेवण्याच्या सूचना नगरपालिका तसच मेरीटाईम बोर्डाला दिल्या आहेत. पर्यटकांनी भान राखून आनंद लुटावा, सेल्फीच्या नादी लागू नये, पोहता येत नसेल तर समुद्रात जाऊ नये, अडचण असल्यास जवळच्या पोलिस स्टेशनकडे मदत मागावी असं आवाहनही रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.