गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई पनवेल रस्त्यावर अनेक तासांचा प्रचंड वाहतूककोंडी

मुंबई म्हटले की ट्राफिक आलेच, मात्र सुट्टी आणि इतर दिवशी हे ट्राफिक इतके भयानक असते की अनेक तास पाच ते दहा मिनिटांच्या रस्त्यांवर अनेक तास थांबावे लागते.

असाच प्रकार पुन्हा झाला आहे. मुंबई-पनवेल महामार्गावर दोन टँकरच्या अपघातामुळे वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण झाली असून,  शनिवारी रमजान ईद असल्यानं सुट्टी आल्यानं अनेकजण पुणे-कोकणात निघाले आहेत. त्यामुळे एकापाठोपाठ एक वाहनांच्या ५ किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत. ही कोंडी इतकी मोठी आहे की नागरिक वैतागले आहेत. याबाबत दैनिक सामना ने वृत्त दिले आहे. त्यानुसार या मार्गावर भयानक कोंडी असून पुढील अनेक तास थांबावे लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळे कोकणात जाणार असला आणि तेही रस्त्याने तर विचार करा मगच प्रवास करा.