सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मोसम अपडेट: प्री मान्सूनचा हाहाकार, मुंबईत अलर्ट, घरात राहण्याचा सल्ला

Pre-monsoon showers drench Mumbai
मुंबईत सुसाट वार्‍यासह झमाझम पावसामुळे जीवन अस्त व्यस्त झाले आहे. महाराष्ट्रात मान्सूनपूर्व प्रचंड पावसामुळे मागील 72 तासात राज्यात 13 लोकांची मृत्यू झाली आहे. स्कायमेटने मुंबईत जोरदार पावसाची आशंका व्यक्त करत लोकांना घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.
 
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आपदा नियंत्रण कक्ष ने दिलेल्या माहितीप्रमाणे अंधेरी येथे 46 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दहिसर येथे 43, धारावी येथे 39, वडाला येथे 35 आणि बायकुला येथे 33 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
 
राज्यात पावसामुळे रेल्वे आणि विमान सेवेवर प्रभाव पडला आहे. पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्र आणि गोव्यात पोहचण्याची शक्यता दर्शवली गेली आहे. तसेच हवामानाच्या एका खासगी कंपनीप्रमाणे आठवड्याच्या शेवटी 8 ते 10 जून दरम्यान झमाझम पाऊस पडण्याची शक्यता आहे.