बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना संधी

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेनेने डॉ. दीपक सावंत यांच्या ऐवजी विलास पोतनीस यांना संधी देण्यात दिली आहे. दीपक सावंत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धक्का दिला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपावलाय. डॉ. दीपक सावंत हे राज्यमंत्री मंडळात आरोग्यमंत्री आहेत. गेली 18 वर्ष ते विधानपरिषद आमदार आहेत. नियमानुसार अजून 6 महिने सावंत मंत्रीपदावर राहू शकतात. मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने पुन्हा संधी नाकारल्याने डॉ. सावंत व्यथित आहेत.पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी गेले अनेक दिवस डॉ. सावंत यांचे प्रयत्न सुरु होते. पण सावंत यांच्या पदरी अखेर निराशा पडली आहे. 
 
दरम्यान, विलास पोतनीस बोरीवलीचे विभागप्रमुख आहेत. तसेच लोकाधिकार समितीचे गेली अनेक वर्षे ज्येष्ठ पदाधिकारी देखील आहेत.