बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेतकरी संपामुळे लासलगाव बाजार समितीत शेतमालाची आवक घटली

शेतकरी वर्गाने पुकारलेल्या संपाचा मोठा फटका देशातील नव्हे तर आशियातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीला बसला आहे. कोणताही माल विक्री करायचा नाही म्हणून अनेकांनी माल विक्रीस आणलाच नाही, त्यामुळे उलाढाल ठप्प झाली आहे.

शेतकरी संपाला गेल्यावर्षी एक जून पासून सुरू झालेल्या संपानंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.आजपासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दिवसभरात फक्त ९ वाहने लीलावास आली.संपूर्ण बाजार आवार हा ओस पडलेला होता.लासलगाव मधील सर्व अर्थकारण हे या बाजार समितीवरच अवलंबून असल्याने संपूर्ण लासलगाव मध्ये संपाच्या पहिल्या दिवशिच परिणाम जाणवू लागलेला आहे.

शेतकरी संपामुळे कांदा,भाजीपाला,धान्य यांच्या आवकेवर फटका बसल्याचे दिसून आले.तर दुसरीकडे ग्रामीण अर्थकारण संकटात सापडलं आहे. शेतकरी संपामुळे आशियातली सर्वात मोठी कांदा बाजार समिती असलेली लासलगाव बाजार समिती ओस पडली आहे. दररोज होणारी १५ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक आणि दोन ते अडीच कोटी करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी काल पासून (शुक्रवार) दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे.