बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

राज्याचे क़ृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. फुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
 
फुंडकर हे जुलै 2016 मध्ये फडणवीस सरकाराच्या मंत्री मंडळात सामील झाले होते. भाजपचे वरिष्ठ नेते असून त्यांनी वर्ष 1991 ते 96 या काळात भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते. फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले तर तीन वर्ष खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. फुंडकर हे विधानपरिषदेतील विरोध पक्षनेतेही होते.