सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2023 (21:02 IST)

कंटेनरच्या धडकेत दोन जैन साध्वींचा मृत्यू

नाशिक :मुंबई - नाशिक महामार्गावर कसारा घाटा जवळ कंटेनरच्या धडकेत दोन जैन साध्वींचा मृत्यू झाला. महासती प.पू. श्री. सिद्धायिकाश्रीजी म.सा व प.पू. श्री हर्षायिकाश्रीजी म.सा ही मृत झालेल्या जैन साध्वींची नावे आहे. नाशिक येथे चातुर्मासाठी ते पायी येत असतांना सदरचा अपघात झाला.
 
या अपघातात कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला अगोदर धडक दिली. त्यानंतर पायी चालणाऱ्या जैन साध्वी यांना धडक दिली. पहाटे ५ वाजता हा अपघात हॅाटेल ऑरेंज सिटीजवळ झाला. या जैन साध्वींचा नाशिक येथील पवननगर येथील जैन स्थानकात येणार होत्या. श्रमण संघीय सलाहकार श्री सुमतिप्रकाशजी म.सा. वाचनाचार्य प्रवर श्री विशाल मुनिजी म.सा. यांच्या या दोन्ही साध्वी सुशिष्या होत्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor