Marathi Biodata Maker
✕

छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताचा भयानक थरार! भरधाव कंटेनर थेट मिरवणुकीत; १४ जण गंभीर, २ ठार

Updated: मंगळवार, 15 सप्टेंबर 2026 (10:54 IST)
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश स्थापनेच्या मिरवणुकीत एक भीषण आणि थरारक अपघात झाला आहे, जिथे एका भरधाव कंटेनरने मिरवणुकीतील तब्बल १४ जणांना चिरडले. या दुर्दैवी घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून एका चिमुरड्यासह १२ जण गंभीर जखमी झाले आहे. मिरवणूक मार्गावर असतानाच अचानक एक अनियंत्रित व भरधाव कंटेनर थेट गर्दीत घुसला आणि त्याने १४ जणांना चिरडले. यामुळे आनंदाचे वातावरण क्षणात आक्रोशात बदलले. हा अपघात पिंपीराजा गावाजवळ चित्तेपिंपळगाव-करमद रस्त्यावर झाला, जिथे गणेश आगमन मिरवणूक काढण्यात येत होती. भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित कंटेनर ट्रकने मिरवणुकीला धडक दिली, ज्यात अनेक लोक जखमी झाले. कंटेनर चालकाने चौकशीदरम्यान सांगितले की, वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा भीषण अपघात घडला. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
ALSO READ: बेळगावमध्ये भीषण आगीत होरपळून कुटुंबातील चौघांचा मृत्यू<> Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

नवजात बाळ ३.५ लाख रुपयांना विकले, अमरावतीत रुग्णालय सील, डॉक्टरला अटक

बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते उद्घाटन होणार

Asian Para Games सुवर्णा राजने भारतासाठी १५ वे सुवर्णपदक जिंकले, थाळीफेकमध्ये इतिहास रचला

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये मोठा अपघात; बस उलटल्याने ११ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना आज खेळला जाणार

पुढील लेख
Show comments