शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (10:56 IST)

वेळ पडल्यास टोकाची भूमिका

नोटाबंदीच्या निर्णयावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तलवार उपसली आहे. टोकाची भूमिका घेण्यास मी मागे पुढे पाहणार नाही, असा  स्पष्ट इशारा शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना दिला.  
 
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या 3 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला यानंतर ते बोलत होते. 
 
ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटप्रमाणे जनमत चाचणी घेतली जात आहे. पण जनतेचा कौल बघून तिकडच्या पंतप्रधानांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. इथे तसे होणार आहे? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे. तसेच सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घऊ शकत नाही. नोटाबंदीआधी जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते, असेही उद्धव ठाकारे म्हणाले. 
 
तसेच त्रास होत असेल तर जनतेनं आक्रोश केला पाहिजे असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटले.