शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (20:50 IST)

दुर्दैवी घटना : रस्त्यात कुत्रा आडवा आला, अपघातामध्ये चिमुकली दगावली

नाशिकमध्ये रस्त्यात कुत्रा आडवा आल्यामुळे अपघात होऊन एका चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागले आहे. नांदूरनाका ते जत्रा हॉटेल रस्त्यावरील अपघाताची ही दुर्दैवी घटना आहे. 
 
दिव्यांश्री घुमरे (2 वर्ष) असे मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. कोणार्कनगर येथील प्रज्ञा सोसायटीत वास्तव्यास असणारी दिव्यांश्री आई दिपालीसोबत दुचाकीवरून जात होती. नांदुर नाका ते जत्रा हॉटेल मार्गावरील बांम्बूज हॉटेलसमोर जात असताना त्यांच्या दुचाकीला कुत्रा आडवा आला. अचानक कुत्रा समोर आल्याने आईला अकस्मात दुचाकीचा ब्रेक दाबावा लागला. पण वाहन नियंत्रित झाले नाही आणि हा अपघात झाला. यात दिव्यांश्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारा दरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला. 
Edited by : Ratnadeep Ranshoor