सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (15:38 IST)

नाशिकात विद्यार्थ्याची आत्महत्या

death
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एका महाविद्यालयाच्या हॉस्टेल मध्ये बीकॉमटीवायच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गौरव सैंदाणे असे या मृत तरुणाचे नाव असून तो डाग सौदाना तालुका सटाणा येथील रहिवासी होता. तो नाशिकच्या एका नामांकित हॉस्टेल मध्ये राहत असून तो सीए मामाकडे पार्ट टाइम कामाला जात होता. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या त्याच्या शेजारच्या खोलीतला एक अन्य विद्यार्थी त्याच्या रूमवर सकाळी इस्त्री मागण्यासाठी गेला असता गौरवने आत्महत्या केल्याचे समजले. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.  पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited By- Priya Dixit