शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2019 (09:26 IST)

मतदान संपले आता पुण्यात पुन्हा पाणी कपात २ मे रोजी पाणीपुरवठा नाही

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दीड-दोन महिने आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी असलेली पाणी पुरवठा बंद ठेवत असलेल्या पुणे महापालिकेकडून निवडणुका जाहीर होताच दर गुरुवारी होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली होती. मात्र या  निवडणूक अर्थात मुख्य मतदान पूर्ण होताच तापलेल्या उन्हाच्या तडाख्यामध्ये मनपा कडून अघोषित पाणी कपात सुरु करण्यात आली आहे. यामुळे येत्या गुरुवार दि.२ मे रोजी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण समस्या उभी राहिली आहे.
 
शहराला पाणी पुरवठा करणार खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा शिल्लक असला तरी राज्य आणि जिल्ह्यात असलेल्या   दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यांपासूनच जलकेंद्र, पंपीग स्टेशन आणि  पाईप लाईनच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. त्यामुळे ही पाणी कपात सुरु असते. यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे प्रमाण पंधरा दिवसांवरुन दर आठवड्याला पाणी पुरवठा बंद करण्यात येत होता.  मात्र आता पुन्हा ही कपात लागू झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री  गिरीश बापट यांना देखील निवडणूक प्रचार करतांना पाणी कपाती मुळे नागरिकांच्या रागाला सामोरे जावे लागले होते.