मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:53 IST)

राज्यात भीषण पाणीटंचाई, केवळ 20.28 टक्के जलसाठा शिल्लक

महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये केवळ 20.28 टक्के जलसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिह्यांमध्ये दर आठवडय़ाला दोनशे टँकरची मागणी वाढत आहे. मे महिन्यात पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. राज्यात मे 2016 सारखी भीषण पाणीटंचाई होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
 
मागील वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे राज्यातल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर 5 हजार 500 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये विहिरी कोरडय़ा पडल्या असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. आजच्या घडीला राज्यात सुमारे 4 हजार 594 टँकरनी वाडय़ावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात सध्या अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खासकरून मराठवाडय़ाला मोठा फटका बसला आहे. मराठवाडय़ात सध्या 2 हजार 470 टँकरनी वाडय़ावस्त्यांची तहान भागवली जात आहे.