शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (15:53 IST)

आमचा पाठींबा युतीला नाही - मराठा क्रांती मोर्चा ठाणे

ठाणे येथे मराठा क्रांती मोर्चाने लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा नाही दिला असे स्पष्ट केले आहे. मराठा मोर्चाच्या ठाणे शाखेने त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. मराठा मोर्चाने पाठिंबा दिल्याचा दावा युतीने काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यावर आता मराठा मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जेव्हा राज्यात मराठा क्रांती मोर्चा होत होते तेव्हा आम्ही मोर्चेकरी 15 दिवस तुरुंगात होतो. आमच्यावर गुन्हे दाखल होत होते, त्या वेळी आम्ही तुरुगांत होतो तेव्हा कुठे गेले होते हे सर्व पळकुटे? असा प्रश्न मराठा समाजाने पत्रकातून उपस्थित केला आहे. त्यात ते पुढे म्हणाले की शिवसेना-भाजप युतीने 21 एप्रिल रोजी मराठा क्रांती मोर्चामधील काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले आणि मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने पत्रकार परिषद घेतली होती, तर तेव्हा त्यांनी युतीला जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र जे पदाधिकारी होते हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असा होता.