सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:43 IST)

बीएसएनएलच्या 35 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ प्लानमध्ये बदल

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने आपल्या 35 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ प्लानमध्ये बदल केला आहे. आपल्या जुन्या प्लानमध्ये बदल करत कंपनीने काही नवीन प्लान बाजारात आणले आहेत.

बीएसएनएलच्या ग्राहकांना आतापर्यंत 35 रुपयांच्या प्लानमध्ये 200 एमबी डेटा वापरायला मिळत होता. मात्र, आता नव्या प्लाननुसार तब्बल ५ जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळणार आहे. याचाच अर्थ आधीपेक्षा 25 पट अधिक जास्त डेटा मिळणार. कंपनीने या प्लानमधला डेटा वाढवला असला तरी प्लानच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आला नाही. पूर्वीप्रमाणेच प्लानची वैधता 5 दिवसांची असणार आहे. 
 
53 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्येही कंपनीने बदल केला असून या प्लाननुसार आता 250 एमबी डेटाऐवजी युजर्सना तब्बल 8 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र, या प्लानची वैधता 21 दिवसांऐवजी 14 दिवसच असणार आहे. याशिवाय 395 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग (मुंबई व दिल्ली वगळता) मिळेल. तसंच युजर्सना प्रत्येक दिवशी 2 जीबी डेटा मिळेल. या प्लानची वैधता 71 दिवसांची आहे.