गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (16:16 IST)

जी वचनं दिली आहेत ते आम्ही पूर्ण करुन दाखवणार : आदित्य ठाकरे

“महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेने जी वचनं दिली आहेत ते आम्ही पूर्ण करुन दाखवणार. निवडणुकीचा तेवढा आम्ही विचार करत नाही. अर्थात निवडणूक ही लढावी लागते. त्यासाठी आपण मेहनत घेतो. पण त्यापुढे जावून जेव्हा आपण जिंकून येता तेव्हा मधल्या पाच वर्षाच्या कालावधीत असतो. या पाच वर्षात लोकांना जी वचनं दिली असतात त्यांची कामं करायची असतात”, अशी भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली MMRDA मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
 
“आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक अडीच ते पाच वर्षात विविध पातळीवर निवडणूक होत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात ठेवून महापालिकेचं बजेट सादर होणार नाही. मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने बजेट सादर होईल”, असं मत आदित्य ठाकरे यांनी मांडलं.
 
“केंद्राच्या बजेटवर काही लोकांच्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यांसमोर बघितल्या. निवडणुका नाहीत त्या राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आलेली नाही. निवडणुका लक्षात घेऊन काही राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.