संबंधित माहिती
- राष्ट्रीय महामार्गाचे काम कोणत्याही अडचणींशिवाय सुरळीत करण्यासाठी दोन कोटींची खंडणी मागणारा तोतया माहिती अधिकार कार्यकर्ता गजाआड
- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी; कलम ३६ लागू
- अहमदनगरमध्येही मराठीतून पाट्या, दुकानदाराना १५ दिवसांची मुदत
- अहमदनगर शहराच्या वाहतुकीत महत्वाचे बदल, प्रवास करण्यापूर्वीच जाणून घ्या
- सामूहिक वाढदिवस साजरा करून एकाच दिवशी 100 केक कापले
टाळणेकामी नेवासा खुर्द येथील आठवडे बाजार बंद
आषाढी वदय कामिका एकादशी व नेवासा आठवडे बाजार रविवार, २४ जूलै २०२२ रोजी आहे. आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेलेले वारकरी परतीच्या मार्गावर नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात. यामुळे अंदाजे ७ लाख भाविकांची गर्दी शहरात होत असते.
म्हणून मोठया प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळणेकामी नेवासा खुर्द येथील आठवडे बाजार रविवार,२४ जूलै २०२२ रोजी बंद ठेवण्यात येत आहेत. असे आदेश अहमदनगर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी जारी केले आहेत.
आषाढी वदय कामिका एकादशी व आठवडे बाजार २४ जूलै २०२२ एकाच दिवशी असल्यामुळे शहरात मोठया प्रमाणावर अनावश्यक गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून मोठया प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळणेकामी मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदी अन्वये नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द, ता. नेवासा येथील २४ जूलै २०२२ रोजीचा आठवडे बाजार बंद ठेवणेबाबत आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी पारित केले आहेत.
