शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (20:56 IST)

तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचं कारण काय? सुप्रिया सुळे यांचा सवाल

supriya sule
सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा हे मंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत. मेरीटवर प्रकल्प येत असताना असं काय घडलं की तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात गेले आणि ते जाण्याचं कारण काय त्याचे सत्य नागरीक म्हणून जाणून घेण्याची गरज आहे असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 
मुंबईतील बेस्टच्या बसेसवर मराठी दिवाळीच्या शुभेच्छा बॅनर पाहिले. शुभेच्छा दिल्याने बेस्टला पैसे मिळत असतील तर आनंद आहे. दिवाळीच्या शुभेच्छा द्या ना… मराठीवर प्रेम असेल तर कृती करुन दाखवा. मराठी भाषेसाठी काही तरी वेगळं करा. स्वतःच्या जाहिरातबाजीमध्ये मराठीपणा नको आम्ही मराठी लोकं फार स्वाभिमानी आहोत असेही  सुळे यांनी सरकारला ठणकावून सांगितले. आनंद शिधा दिवाळीला लोकांना वेळेत मिळाला का? काही ठिकाणी फोटो व्यवस्थित झाले नव्हते म्हणून वाटप झाले नाही.
 
आता यामध्ये फोटो महत्त्वाचा की गरीब माणूस महत्त्वाचा ज्याच्यासाठी तुम्ही हे करत आहात. हा पब्लिसिटी स्टंट होता. दिवाळीच्या शुभेच्छा महाराष्ट्रातील जनतेला द्या ना. जनतेमुळेच आपण आहोत. हे जाहिरातीचे सरकार आहे हे दुर्दैवी आहे असे स्पष्ट मतही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. पहिल्यांदा ईडी सरकारच्या विरोधात एक संवेदनशील नेता दिसला त्याचं नाव बच्चू कडू आहे. त्यांनी काल संवेदनशीलपणे 50 खोक्यांचा उल्लेख केला. बच्चू कडू यांनी आरोग्यासाठी, अपंगांसाठी चांगले काम केले आहे. 50 खोक्यांचे ऐकून त्रास होतोय हे सांगितले त्याचा आनंद झाला असेही  सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 Published by : Ratandeep