रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (10:51 IST)

दिवाळीत दिवे का लावतात ?

diya
दिवाळीच्या रात्री प्रत्येक घरात लावले जातात दिवे, जाणून घेऊया याचे कारण-
 
पृथ्वी, आकाश, अग्नी, जल, वायू, या पाचही घटकांनी दिवा तयार होतो, याने प्रकाश होतो आणि वातावरण शुद्ध होते.
 
धनत्रयोदशीपासून भाऊबीजपर्यंत दिवा लावल्याने पाच तत्वांचा समतोल साधला जातो आणि त्याचा प्रभाव व्यक्तीच्या आयुष्यावर वर्षभर राहतो.
 
दीपावलीच्या दिवशी केवळ महालक्ष्मी देवीसाठीच नव्हे तर पितरांसाठीही दिवे लावले जातात.
 
पितरांची रात्र दिवाळी-अमावस्यापासून सुरू होते, अशात दीप प्रज्वलनाची प्रथा आहे.
 
त्यांच्यासाठी प्रकाशाची व्यवस्था केली जाते जेणेकरून आपले पूर्वज मार्गापासून विचलित होऊ नयेत. बंगालमध्ये ही प्रथा प्रचलित आहे.
 
सर्वत्र अंधार असताना अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. अंधारापासून मुक्त होण्यासाठी दिवा लावावा.
 
अमावस्येला वाईट शक्तींना कमजोर करण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावले जातात.
 
भगवान श्रीरामाच्या आगमनानंतरही दीप प्रज्वलित करून आनंद साजरा करण्यात आला, त्यामुळेच दिवे लावले जातात.