रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Updated : रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (10:50 IST)

Diwali Laxmi Puja Prasad लक्ष्मी पूजनात या पदार्थांचा नैवेद्य नक्की दाखवा

lakshmi prasad
दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला या 10 प्रकाराचे नैवेद्य दाखवा.... जाणून घ्या देवी लक्ष्मीच्या आवडीचे 10 शुभ प्रसाद
दिवाळी हा सण आश्विन महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान देवीला आवडीचे पदार्थ अर्पण केले जातात. नंतर हा प्रसाद स्वीकारला जातो. दीपावलीच्या दिवशी आपण देखील हे नैवेद्य दाखवून देवी लक्ष्मीला अर्पण केल्यास त्यांची कृपा सदैव आपल्यावर राहील. 
कोणते आहेत माता लक्ष्मीचे 10 शुभ प्रसाद.
 
1. पिवळ्या किंवा पांढर्‍या रंगाची मिठाई: पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची मिठाई देवी लक्ष्मीला अर्पण केली जाते. केशरी भाताचा नैवेद्य दाखवून देखील देवीला प्रसन्न करता येतं.
 
2. खीर: बादाम, चारोळी, मखणा आणि काजू मिसळून तयार खीर देवी लक्ष्मीला अर्पण करु शकता.
 
3. शिरा : शुद्ध तुपात बनवलेला शिरा देवी आईला खूप प्रिय आहे.
 
4. ऊस: दिवाळीच्या दिवशी देवीला ऊस अर्पण केला जातो कारण ऊस देवीच्या पांढर्‍या हत्तीला खूप प्रिय असतो.
 
5. शिंगाडा : देवी लक्ष्मीला शिंगाडा खूप प्रिय आहे. कारण त्याचा उगमही पाण्यापासून होतो.
 
6. माखाणा : लक्ष्मी देवी समुद्रातून उगम पावली, त्याचप्रमाणे माखाणाची उत्पत्तीही पाण्यापासून झाली. कमळाच्या रोपापासून माखणा मिळतो.
 
7. बत्ताशे : बत्ताशे देवीला खूप प्रिय आहे. लक्ष्मी पूजनात बत्ताशे अर्पण केले जातात.
 
8. नारळ: नारळाला श्रीफळ देखील म्हणतात. ते शुद्ध पाण्याने भरलेले असतं.
 
9. विडा : लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये गोड विड्याचे खूप महत्त्व आहे. हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
 
10. डाळिंब: लक्ष्मी देवीला फळांमध्ये डाळिंब तसेच सीताफळ देखील आवडतं. दिवाळीच्या पूजेच्या वेळी डाळिंब अर्पण करावे.
 
याशिवाय पूजेदरम्यान 16 प्रकारच्या करंज्या, पापडी, अनरसा, लाडू अर्पण केले जातं. फुलोरा देखील तयार केला जातो. याशिवाय तांदूळ, बदाम, पिस्ता, खारिक, हळद, सुपारी, गहू, नारळ असे सर्व अर्पण केलं जातं. केवड्याची फुले व आम्रबेलेचा नैवेद्य दाखवण्यात येतं. या दिवशी जो कोणी लक्ष्मीजीच्या मंदिरात लाल फुल अर्पण करुन नैवेद्य दाखवतं त्यांच्या घरात सर्व प्रकारची शांती आणि समृद्धी नांदते. कोणत्याही प्रकारे पैशाची कमतरता भासत नाही.