Marathi Biodata Maker
✕

Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Updated: सोमवार, 24 एप्रिल 2023 (16:25 IST)
या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात 
नवीन आशा आणि आनंद घेऊन आला आहात.
तुमचा वाढदिवस सुंदर जावो 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
या विशेष दिवशी
माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
मला आशा आहे की हा अद्भुत दिवस 
तुमचे हृदय आनंदाने, आशीर्वादाने आणि अत्यंत आनंदाने भरून जाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जीवेत शरद: शतं
पश्येत शरद: शतं
भद्रेत शरद: शतं
अभिष्टचिंतनम
जन्मादिवसस्य शुभाशय:
 
सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा धनवान हो
माता सरस्वती सारखा विद्वान हो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जगातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू द्या  
कारण तुम्ही सर्वोत्तम लोकांपैकी एक आहात 
माझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
 
आज आणि नेहमी तुम्हाला शांती, प्रेम 
आणि उत्तम आरोग्याच्या खूप शुभेच्छा
तुमचा वाढदिवस आल्हादायक जावो
 
जो कायमचा तरुण आहे 
अशा हसमुख व्यक्तीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
 
या विशेष दिवशी 
तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा 
सुख शांती जीवनात नांदो 
वर्षाव पडो शुभेच्छांचा
 
नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरता? त्वचेला होऊ शकते ‘हे’ नुकसान!

ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत होऊ शकते मदत!

वयाची पन्नाशी ओलांडली तरी राहा फिट आणि निरोगी; दररोज करा ही सोपी योगासने!

नैतिक कथा : मूर्खांचे राज्य; गोष्ट जुलमी राजा आणि विद्वानांची

आता, भेंडी अनेक दिवस ताजी राहील; फक्त ही सोपी युक्ती करा

पुढील लेख
Show comments