सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By

Love Making श्रावणात शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? विवाहितांना दिला जात आहे हा सल्ला !

Love Relation
Physical Relations During Shravan श्रावण महिना महादेवाचा प्रिय महिना आहे. या महिन्यात महादेवाची पूजा - उपासना करण्याचं खूप महत्त्व आहे. धर्म-कर्म केल्या जाणार्‍या या महिन्यात काय करावे आणि काय नाही याबद्दल अनेकांच्या मनात खूप प्रश्न असतात-
 
याशिवाय या महिन्यात भोजन आणि पूजेचे कठोर नियम पाळावे लागतात. यादरम्यान काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. या महिन्यात आयुर्वेद आणि शास्त्रानुसार शारीरिक संबंध निषिद्ध आहेत, विशेषतः नवविवाहित जोडप्यांसाठी हा नियम लागू होतो. चला जाणून घेऊया श्रावणमध्ये शारीरिक संबंध का ठेवू नयेत?
 
आयुर्वेद मत
आयुर्वेदाच्या मतानुसार श्रावण महिन्यात माणसाच्या आत रसाचा संचार जास्त असतो, त्यामुळे कामाची भावना वाढते. हवामान देखील यासाठी अनुकूल आहे, त्यामुळे नवविवाहित जोडप्यांमध्ये अधिक संबंध ठेवल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
 
म्हणून या महिन्यात माहेरी घेऊन जाण्याची परंपरा
श्रावण महिन्यात पुरुषांनी ब्रह्मचर्य पाळून वीर्य राखावे. आयुर्वेदात असे लिहिले आहे की या महिन्यात गर्भधारणेमुळे जन्मलेले मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असू शकते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत नवविवाहित स्त्रिया श्रावण महिन्यात त्यांच्या माहेरी राहण्यासाठी जात असल्याची परंपरा बनविली गेली आहे.
 
धार्मिक बाजू
वासनेच्या भावनेवर मात करण्यासाठी श्रावण महिन्यात शिवाची पूजा करण्यामागे हेच कारण आहे. भगवान शिव वासनेचे शत्रू आहे. श्रावणात कामदेवाने शिवावर वासनेचा बाण सोडला होता, त्यामुळे शिवजी क्रोधित झाले आणि त्यांनी कामदेवाची राख केली.
 
या दिवसात शारीरिक संबंध ठेवू नये
शास्त्रांप्रमाणे काही दिवस असे असतात जेव्हा पती-पत्नीने कोणत्याही रुपात शारीरिक संबंध ठेवू नये, जसे अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, रविवार, संक्रांती, संधिकाळ, श्राद्ध पक्ष, नवरात्री, श्रावण मास आणि ऋतुकाळ इतर दिवसात स्त्री आणि पुरुषाने एकमेकांपासून दूर राहावे. हे नियम पाळल्याने घरात सुख, शांती, समृद्धी आणि आपसात प्रेम-सहयोग याची भाववा वाढते नाहीतर गृहकलह आणि धन हानी याव्यतिरिक्त एखादा अपघाती घटनांना आमंत्रण देतो.

या व्यतिरिक्त लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी-
जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या जोडीदाराने व्रत केले असेल तेव्हा संबंध ठेवू नका.
सूर्योदयानंतर संबंध ठेवणे योग्य मानले जात नाही.
अविवाहित महिला आणि पुरुषांनी संबंध ठेवणे योग्य नाही.
श्रावणात संबंध टाळावेत.
कोणत्याही ग्रहण काळात संबंध ठेवणे अयोग्य असतं.